राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या ३० विध्यार्थ्यांनी मूल येथील राजुरी स्टील अँड अलॉयंस या उद्योग समूहाला अभ्यासाच्या दृष्टीने भेट दिली.
भेटीदरम्यान राजुरी स्टील अँड अलॉयंस या उद्योग समूहाचे सहायक व्यवस्थापक मनीष रक्षमवार यांनी उद्योग आणी प्रकल्पा विषयी सविस्तर माहिती देऊन युवकांनी या स्पर्धेच्या युगात नोकरी बरोबरच उद्योगधंद्याकडे वळण्याचे सांगितले.
महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनात राबविलेल्या अभ्यास दौऱ्यात सहभागी विद्यार्थ्यांनीही प्रकल्पाविषयीं सविस्तरपणे माहिती जाणून घेतली यावेळी डॉ.रागिणी पाटील, प्रा.मुकेश निखाडे व प्रा.आशिष शेंडे उपस्थित होते.