राष्ट्रपिता महात्मा गांधी कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे शासन पत्र १६जून, २०२३अन्वये राज्यात २९जुलै ,२०२३ या दिवशी भारतीय शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आलेल्या शैक्षणिक धोरणास तीन वर्ष पूर्ण होत असून या दिवसाचे औचित्य साधुन राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे सांस्कृतिक विभागाद्वारे दि.२४-२९ जुलै ,२०२३ या कालावधीत “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह ” म्हणून साजरा करण्यात आला.
दि.२४जुलै ,२०२३ ला या कार्यक्रमाचे उद्घाटन कॉलेजचे कार्यकारी प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक स्मिता राऊत यांनी कार्यक्रमामागचा उद्देश आणि त्याची रूपरेषा काय आहे याबद्दल माहिती सांगितली . दि.२५ जुलै,२०२३ ला “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०” या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली.या स्पर्धेत २७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.त्यात अश्विनी अरुण निकुरे (M.sc.द्वितीय वर्ष) हिने प्रथम क्रमांक,तेजस्विनी केवळराम मडावी(B.com.प्रथम वर्ष) हिने द्वितीय व तनुजा प्रकाश गेडेकर(B.A. प्रथम वर्ष) हिने तृतीय पारितोषिक पटकाविले.दि.२६ जुलै,२०२३ ला “ NEP -2020 ” या विषयावर पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आयोजित केली होती.त्यात निधी रवी शेंडे (B.sc. द्वितीय वर्ष) या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक, जानवी प्रकाश काळसर(B.A.प्रथम वर्ष) या विद्यार्थिनी द्वितीय क्रमांक पटकाविला . व आर्य सी. श्यामकुवर (B.sc.तृतीय वर्ष) यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. दि.२८जुलै,२०२३ ला यु-टुयब या सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० याबद्दल जागरूकता निर्माण केली . निंबंध स्पर्धेचे परीक्षण डॉ.रामचंद्र वासेकर ,डॉ.किरण बोरकर यांनी केले. व पोस्टर स्पर्धा यांचे परीक्षण डॉ.दिवाकर उराडे ,प्राध्यापक प्रशांत वासाडे व डॉ. रागिणी पाटील यांनी केले.तसेच गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तर्फे सुद्धा “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह “निमित्ताने पोस्टर आणि PPT सादरीकरण स्पर्धा घेण्यात आले.त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी उत्स्पूर्तेने भाग घेऊन पोस्टर स्पर्धेमध्ये निधी रवी शेंडे हिने प्रथम क्रमांक (B.sc द्वितीय वर्ष)व यश खुशाल भैसारे ( B.sc प्रथम वर्ष) यांनी तृतीय क्रमांक ,तसेच PPT सादरीकरणात निधी रवी शेंडे द्वितीय व प्राध्यापक ग्रुप मधून प्रा.स्मिता राऊत यांनी द्वितीय क्रमांक पटकावून कॉलेज च नाव उंचावले. या सर्व स्पर्धा कॉलेजचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.स्मिता राऊत, सांस्कृतिक विभागाचे सदस्य .डॉ.किरण बोरकर , डॉ.रामचंद्र वासेकर , प्रा. महानंदा भाकरे यांनी प्रयत्न केले तसेच कॉलेज मधील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सुद्धा सहकार्य लाभले.