राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 31 जुलै 2023 ला प्राणीशास्त्र विभागातर्फे जागतिक ओ.आर.एस. दिवस साजरा करण्यात आला. या दिवसानिमित्त प्रा.डॉ. किरण बोरकर यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन सावली येथे जनजागृती कार्यक्रम राबविला. पावसाळ्यामध्ये पाण्यापासून होणाऱ्या बिमाऱ्या तसेच डायरिया, कॉलरा होऊ नये व झाल्या तर त्यासाठी कुठली काळजी घ्याव्यात यासाठी तसेच ओ आर एस च महत्त्व सावली येथील लोकांमध्ये पोस्टरद्वारे जनजागृती केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. प्रकाश खोब्रागडे , प्राणीशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रकाश घागरगुंडे ,श्री गणेश गड्डमवार यांचे सहकार्य लाभले.