सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातर्फे दिनांक 17 ऑगस्ट 2023 ला वर्मी कंपोस्टिंग या विषयावर वर ऍड ऑन सर्टिफिकेट कोर्स चे उदघाटन संपन्न झाले, महाविद्यालयातील हॉल मध्ये सदर समारंभ संपन्न झाला, समारंभाचे उदघाटन सावली च्या तालुका कृषी अधिकारी सौ अश्विनी गोडसे यांच्या हस्ते संपन्न झाले, समारंभाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे होते, प्रा प्रशांत वासाडे, प्रा पल्लवी बोरकर, प्रा रागिणी उमलवार यांची या प्रसंगी विशेष उपस्थिती होती, सुरवातीला प्राणिशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा प्रकाश घागरगुंडे यांनी प्रास्ताविक पर भाषणात विषयाची सुरवात केली, सौ गोडसे यांनी आज रासायनिक खतांचा दुष्परिणाम जाणवत असून वर्म(गांडुळ) खत ही काळाची गरज असून कमी खर्चात कंपोस्ट केलेलं हे खत कस उपयुक्त आहे याची विस्तृत माहिती विशद केली, सोबतच त्यांनी तृणधान्ये महत्व समजावत विद्यार्थ्यांना तृणधान्य आहाराचे महत्व पटवून दिले, प्राचार्य खोब्रागडे यांनी अध्यक्षीय भाषणात प्राणिशास्त्र विभागाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना या कोर्स चे प्रॅक्टिकल शेतात करून बघायचे आवाहन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राणिशास्त्र विभागाच्या प्रा डॉ सौ किरण बोरकर-कापगते यांनी केले, कार्यक्रमात महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या