राष्ट्र सेविका समिती च्या प्रारंभिक वर्गाच्या उद्घाटन प्रसंगी संध्या ताई कवासे यांनी समिती परिचय यावर उद्बोधन केले. राष्ट्राच्या उन्नती साठी समिती शाखा माता भगिनींना सक्षम करण्याचे कार्य करते, त्यासाठी मातृ शक्ती ने संघटनेच्या माध्यमातून सक्रिय होण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
18_23 एप्रिल या कालावधीत लोक मान्य टिळक महाविद्यालयाच्या प्रांगणात , लुलूताईंच्या अध्यक्षतेखाली सुवर्णा ताई दिवाकर, उमरेड वर्गाधिकारी यांच्या उपस्थितीत 12 स्थानांवरून शिबिरार्थि सहभागी झाले. स्थानिक सेविकांच्या सहभागातून प्रारंभिक वर्ग सुरू झाला. वर्गावर प्रांत संपर्क प्रमुख अनिता लांबे, जिल्हा कार्यवाहीका सुनंदा भाई उपस्थितीत आहेत.
वर्गावर दंड, योगचाप, नियुद्ध तसेच बौद्धिक आणि गुण संवर्धन प्रशिक्षण दिले जाते.