मूल( प्रतिनिधी.) नीट परिक्षेच्या निकाल जाहीर झाला असून
यात मुल शहरातील कु. मोहिनी तुळशिराम आगडे हि नीट परिक्षेत ७२० पैकी ६७६ गुण मिळवून देशातुन ११६६ क्रमांकावर आली . माउंट कान्हेट मुल इथे ५ वी पर्यंत शिक्षण घेऊन , जवाहर नवोदय विद्यालय बाळापुर तळोधी इथे १० वीत ९५ टक्के, सेंटपाॅल ज्युनिअर कॉलेज नागपूर येथे १२ वीत ९० टक्के, दोन वर्षे भारतात कोविड ची साथ होती त्यामुळे घरीच आँनलाईन क्लासेस दोन वर्षे अभ्यास करून नागपूर इथे एक वर्ष क्लासेस केले, आई आदर्श ग्रामसेविका, वडील तांदळाच्या व्यवसायी, साधारण कुटुंबातील मोहिनी नीट परिक्षेत देशातुन ११६६ क्रमांकावर आली., सर्वत्र मोहिनीचे कौतुक होत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पदाधिकारी सतीश राजुरवार, धर्मेंद्र सुत्रपवार यांनी रोहिणी च्या निवासस्थानी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले,