मुलं:—-नवभारत विद्धालय येथील सहा.शिक्षीका,वृक्ष प्रेमी,मूल नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियान
प्रचारक सौ.वषॉ भांडारकर यांची
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था
यांचे वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक
पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
शैक्षणीक कार्य प्रामाणिकपणे सांभाळून निसर्गाप्रती संवेदनशील राहून जनजागृती करण्याचे महतकायं
सौ.वर्षा भांडारकर गत अनेक वर्षांपासून करीत आहेत. वृक्ष प्रेमी म्हणून संपूर्ण जिल्ह्यात त्यांची वेगळी
ओळख आहे हे विशेष.
या विशेष कार्याची दखल घेऊन मराठीचे शिलेदार या बहुचचिंत संस्थेने
यंदा हा प्रतिष्टेचा बहुमानवजा पुरस्कार सौ.भांडारकर यांना घोषीत केला आहे.
मान्यवरांचे हस्ते लातूर येथे हा पुरस्कार वितरीत करण्यात येणार असून शिक्षण प़सारक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे,मुख्याध्यापक अशोक झाडे,सहयोगी शिक्षक तथा शहरातील मान्यवरांनी सौ.भांडारकर यांचे अभिनंदन केले आहे.