अरुननगर जिल्हा- गोंदिया येथील रहिवासी विनय मंडल हा जवळच असलेल्या इंदोरा येथे तलावावर मासे पकडण्यासाठी गेला असताना तिथे दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करत ठार केले, ठार केल्या नंतर वाघाने विनय मंडल याला फरफटत झुडपात जंगलात नेले, अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत मंडल याचा मृतदेह शोध घेतांना सापडला, सदर घटनेमुळे परिसरातील जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे, सदर गाव हे गोदिया जिल्ह्यात असून गडचिरोली जिल्ह्यातील वडसा पासून अगदी काहीच अंतरावर आहे, अधिकचा शोध वनविभागाचे कर्मचारी घेत आहेत
वाघाच्या हल्ल्यात इसम ठार,अरुननगर जिल्हा- गोंदिया जवळील घटना
RELATED ARTICLES