संत नगाजी महाराज
श्री संत सेना महाराज.
यांचा पुण्यस्मरण महोत्सव
दि.२८ जानेवारी २०२३ रोजी
श्री संत नगाजी नाभिक
सींदेवाही यांच्या संयुक्त विद्यमाने तालेवारसभागृहात संपन्न झाला.
मागील दोन वर्षापासून कोरोनाचा काळ होता.
या कोरोणाच्या
काळामध्ये एकही कार्यक्रम होत नव्हते.
पण आज हा कार्यक्रम घेऊन
हा समाज एकत्र आला याचा
मला खूप अभिमान वाटतोय.
मुलाच्या हाती कातरी द्यायच्या आधी मुलाला
शिक्षण द्यावे.कुणी वकील
व्हायला पाहिजे.कुणी
डॉक्टर , इंजिनिअर,आणि
कुणी राजकारणी झाला पाहिजे.आपल्या आई वडील यांचं आणि समाजाचं नाव
रोशन करावं. अस मला वाटत.त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जीव वाचवणारा जिवा महाले हे नाभिक समाजाचे होते.
त्यांनी शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. म्हणूनच म्हणतात. होता जीवा म्हणून वाचला शिवा. असे थोर पुरुष आणि संत या समाजामध्ये होऊन गेले. समाजाच्या एखाद्या व्यक्तीला गरज पडली असेल तर त्याला मदत केली पाहिजे.
देव कुणामध्ये आहे देव म्हणजे आपले आई-वडील
मनोभावे त्यांचे सेवा करा खरोखरच देव तुम्हाला भेटेल.असे स्वप्नीलजी कावळे
आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
विजय जी मेंढुलकर आपले मनोगत व्यक्त करताना.
मी शिक्षण घेत असताना माझ्या जीवनात अनेक अडीअडचणी आल्या त्या अडीअडचणींना तोंड दिलं
माझ्या घरची परिस्थिती खूप कठीण होती तरी पण त्या परिस्थितीतून मार्ग काढलं आणि मी उच्च पदावर म्हणजे विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव मी हे पद मिळवलं माझ्या जीवनात माझ्या पत्नीने मला खूप साथ दिली .जीवनात कितीही अडचणी आल्या तरी तुम्ही घाबरु नका त्याच्यावर मात करायला शिका तेव्हाच तुम्ही पुढे जाणार असे त्यांनी सांगितले.ते या प्रबोधन मेळाव्याचे सत्कारमूर्ती होते त्यांना समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या मेळाव्यात इयत्ता दहावी बारावी मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थ्यांचा ट्राफी देऊन सन्मानित करण्यात आले.
या जीवनात माणसांनी हसत हसत जगलं पाहिजे. मी नाभिक समाजात जन्माला आलो याचा मला खूप अभिमान आहे. सर्वांचे मतभेद वेगवेगळे असू शकतात. पण मनभेद वेगळे असू शकत नाही. कैची वस्तरा हातात धरा. पण तुम्ही मनामध्ये एक विचार करा मला या देशाचा पंतप्रधान व्हायचं आहे हे स्वप्न तुम्ही बघा. माझा बाप दिवसभर कष्ट करून पोट भरतोय तुम्ही त्या बापाचा विचार करा मला
मला काहीतरी बनायचं आहे. जो गरीब विद्यार्थी आहे त्याला शिकायची आवड आहे पण त्याच्याकडे पैसा नाही. त्याला समाजा तर्फे
मदत केली पाहिजे.आणि तो
पुढे गेला पाहिजे .मी.नाभिक आहे.भिक मागणार नाही .
आपले मनोगत व्यक्त करताना.रवींद्र नलगिंटवार
यांनी सांगितले.
गोंडपिपरी इथून आलेले जेष्ठ
सामा जिक कार्यकर्ते
श्री अतुल भाऊ जांपलावार
यांनी आपले मत यक्त
करताना.श्री संत नगाजी
महाराज श्री संत सेना महाराज.यांचे विचार मनात
आपल्या मनात घ्या. आणि थोर संत महात्म्यासारखे बना.
जाता जाता मी एवढे सांगू इच्छितो दिवा म्हणतो वात द्या नाभिक समाजाला तुम्ही साथ द्या.असे त्यांनी सांगितले. या मेळाव्याचे कार्यक्रमाला उपस्थित म्हणून. सत्कारमूर्ती प्राध्यापक डॉक्टर विजय मेंढुलकर,मान. श्री स्वप्निल जी कावळे, मा. श्री बंडूभाऊ राऊत, मा. श्री श्याम आस्करकर,मा. श्री माधवराव चन्ने, मा. रोशन भाऊ उरकुडे.
मा.प्रा.विनायक येडेवार,
मा रवींद्र नलगिंटवार
तसेच अध्यक्ष कवडूजी मांडवकर,उपाध्यक्ष दिलीप
फुलबानधे, सचिव मा.ज्ञानेश मुत्यालवार,सहसचिव मा.
प्रेमदास मेंधुळकार ,कार्यकारी सचिव.
मा.मधुकर्जी मेश्राम
कार्यकारी मंडळ आणि
विदर्भातील सर्व नाभीक
समाज बांधव प्रबोधन मेळाव्याला बहु संख्येने उपस्थित होते.