Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedविभागस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली अव्वल तीन मध्ये*

विभागस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली अव्वल तीन मध्ये*

महाराष्ट्र शासन तर्फे प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर राज्य विज्ञान व गणित शिकधान संस्था रवीनगर नागपूर यांच्या वतीने सत्र 2022-23 करीता राष्ट्रीय विज्ञान नाट्यत्सव स्पर्धा अंतर्गत विभाग स्तरीय विज्ञान नाटय स्पर्धेचे आयोजन नागपूर येथील संत उरसुला गर्ल्स हायस्कूल येथे करण्यात आले होते, सदर स्पर्धेत नागपूर विभागातील एकूण 12 शाळांनी सहभाग नोंदविला होता, गडचिरोली येथील गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलेची चुणूक दाखवत विज्ञान हे समाजासाठी कस उपयुक्त आहे हे विज्ञान, तंत्रज्ञान आणि लसीची कथा या विषयावर उत्तम अशे सादरीकरण केले, सदर कलेसाठी या संघाला स्पर्धेचे तृतीय पारितोषिक ही मिळाले, गोंडवाना सैनिकी विद्यालयाच्या चमू मध्ये कॅडेट मास्टर ऐश्वर्य कचलामी, अनुप गजभिये,अंशुमन आकेवार, शुभम कोकणे, श्रीहर्ष बुधबावरे, चेतन आत्राम व अनुराग लेकामी यांनी प्रमुख कलाकारांची भूमिका पार पाडली, या चमुचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्ती पत्र, पुष्पगुच्छ, रोख 1001 रुपये देत गौरव करण्यात आला, सदर नाट्यपुष्पाचे लेखन व दिग्दर्शन नरेंद्र उंदीरवाडे यांनी केले, देवेंद्र म्हशाखेतरी यांनी निर्मिती व सुनील लोखंडे यांनी संगीत दिले, प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे यांचे विशेष सहकार्य लाभले, भागवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अद्यक्षा सौ भाग्यश्रीताई आत्राम-हलगेकर, सचिव आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम, मार्गदर्शक क्रुतुराजजी हलगेकर यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments