जानेवारी 2022 मध्ये झालेल्या कुरखेडा नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 9, शिवसेना 5 तर काँग्रेस पक्षाचे 3 नगरसेवक निवडून आले होते, भाजप ला बहुमत मिळवल्यानंतरही भाजपाचीच नगरसेविका जयश्री रासेकर यांनी नाट्यमय रित्या सेना कॉंग्रेस युतीला आपले मत देत गेम पलटी केला होता, त्यामुळे भाजपला बहुमत असूनही विरोधात बसावे लागले होते, नंतर भाजप जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, गटनेते कलाम शेख यांनी सदर नागरसेविकेने व्हीप पाळला नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करत तिचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली होती, आज जिल्हाधिकारी मीना यांनी या प्रकरणाची सुनावणी करत नगरसेविका जयश्री रासेकर यांना अपात्र ठरवले आहे, त्यामुळे कुरखेडा नगर पंचायत मधील सेना काँग्रेस युतीची सत्ता औटघटकेची ठरली असून पुन्हा भाजपची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, मात्र रासेकर या अपील करतील, त्यांना राज्यात भाजपाचीच सत्ता असल्याने स्टे मिळेल का, नंतर काय होईल या चर्चाणा जिल्ह्यात उत आले असले तरी सत्तेपुढे शहाणपण चालत नसते हेही तितकेच खरे आहे
व्हीप झुगारलेल्या कुरखेडा च्या नगरसेविका जयश्री रासेकर यांचे सदस्यत्व रद्द
RELATED ARTICLES