Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedशाळांतील नामांकित योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृहात दिवाळी नंतर प्रवेश बंदी करणार?

शाळांतील नामांकित योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना वसतिगृहात दिवाळी नंतर प्रवेश बंदी करणार?

गडचिरोली:
महाराष्ट्र शासन आदिवासी विभाग अंतर्गत सुरू असलेल्या नामांकित शाळेत त्या योजने अंतर्गत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर शालांमध्ये या वर्षी दिवाळी नंतरच्या सत्रात प्रवेश बंदी केली जाईल असा निर्धार या शाळा चालविणाऱ्या संस्था संघटना नि घेतलेला आहे, या योजने अंतर्गत महाराष्ट्रात नामांकित निवासी शाळांमध्ये 8500 कर्मचारी काम करत असून 54000 विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत, या आधी शासनस्तरावर अनेकदा पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटी घेत सत्र 2020-21 व 2021-22 या सत्राचे अत्यल्प अनुदान प्राप्त झाले आहे तसेच चालू शैक्षणिक सत्र 2022-23 ला सहा महिने उलटल्यानंतरही काहीही अनुदान प्राप्त झाले नाही, एकंदरीत शासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे मागील तीन वर्षांपासून संस्था चालकांवर सदर विद्यार्थ्यांचा आर्थिक बोजा पडत आहे, यात गडचिरोली जिल्ह्यातील सहा नामांकित शाळांनी एकत्रित येत आज दिनांक 04 नोव्हेंबर 2022 रोजी प्रकल्प अधिकारी गडचिरोली यांच्या मार्फत शासनाला निवेदन देत दिवाळी नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास आपली असमर्थता दर्शविली असून येणाऱ्या काळात हा निर्णयाचे पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments