Thursday, February 22, 2024
Homeचंद्रपुरशास. माध्य. आश्रमशाळा, चंदनखेडाची विद्यार्थिंनी निकिता ढोणे हीला विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक

शास. माध्य. आश्रमशाळा, चंदनखेडाची विद्यार्थिंनी निकिता ढोणे हीला विभागीय स्पर्धेत सुवर्ण पदक

आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नागपूर शासकीय व अनुदानित आश्रामशाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा, दि. 01 ते 03 फेब्रुवारी 2023, विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे संपन्न झाल्या. यात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत श्री. श्रीकांत बलकी सर क्रीडा शिक्षक यांचा मार्गदर्शनात चिमूर प्रकल्पातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांच्या एकूण 315 विद्यार्थी खेळाडू मुला-मुलींनी सहभाग नोंदाविला. या स्पर्धेत शास. माध्य. आश्रमशाळा, चंदनखेडाची विद्यार्थिनी शिवानी दडमल हिच्या प्रतिनिधित्वात 53 विद्यार्थी खेळाडू मुला-मुलींची प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धेतून निवड होऊन विभागीय स्पर्धेत सहभाग घेतला होता. विभागीय क्रीडा स्पर्धेतील उंच उडी खेळप्रकारात निकिता योगेश ढोणे, वर्ग 10 ची खेळाडू विद्यार्थिनी हिने नऊ प्रकल्पातील एकूण 18 विद्यार्थीनिंना मागे टाकले व 1.30 मी उंच उडी घेत स्पर्धेत प्रथम स्थान पटकावीत सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेचे 17 वर्ष वयोगटात चंदनखेडा आश्रमशाळेच्या खेळाडू विद्यार्थिनी नेहा ढोणे हिची व्हॉलीबॉल करिता, प्रणाली जीवतोडे हिची हॅन्डबॉल व व्हॉलीबॉल करीता, विद्यार्थी विघ्नेश जीवतोडे याची खो-खो करीता, १४ वर्ष वयोगटात सुजल जीवतोडे याची व्हॉलीबॉल करीता निवड करण्यात आली. उपरोक्त सर्व विद्यार्थी नाशिक येथे होना-या राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील. शास. आश्रमशाळेच्या या यशासाठी *श्री. निलय राठोड, प्रकल्प अधिकारी, चिमूर, श्री नितीन इसोकर, एपिओ प्रशासन,* श्री. देवचंद जुनघरे एपिओ चिमूर यांनी सर्व विद्यार्थी खेळाडू मुल-मुली व त्यांचे क्रीडा शिक्षक याचे कौतक करीत अभिनंदन केले व राज्य स्तरीय स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचा पालकांनी सर्वांचे आभार मानत शुभेच्छा दिल्या.               

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments