खासदार स्व बाळू धानोरकर हे संघर्षातून घडलेले बहुजन समाजाचे नेतृत्व होते असे मत शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब वासाडे यांनी व्यक्त केले. ते शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने आयोजीत नवभारत कन्या विद्यालयात स्वर्गीय खासदार बाळू धानोरकर यांचे श्रध्दांजली कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सामान्य कुटूंबात जन्म घेवून, उच्च स्वप्न पहात, ते पुर्णत्वास नेण्याकरीता, प्रचंड उर्जा आणि धडाडीचे नेतृत्व बाळूभाऊने दिले. चंद्रपूर जिल्हयातील जनतेचे प्रश्न संसदेत मांडून न्याय देण्याकरीता ते खासदार झालेत. त्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ मूलशी जिव्हाळ्याचे नाते होते, त्यांच्या निधनाने शिक्षण प्रसारक मंडळाची मोठी हानी झाल्यांचे मत अॅड. वासाडे यांनी व्यक्त केले.
उपस्थितांनी स्व. बाळू धानोरकर यांचे प्रतिमेला माल्यार्पण करून, दिप प्रज्वलन केले. फुले वाहून आणि दोन मिनीटे मौन बाळगून श्रंध्दाजली अर्पण केली.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे कार्याध्यक्ष डॉ. राममोहन बोकारे, सचिव अॅड. अनिल वैरागडे, व्यापारी असोसिएशनचे श्रीकांत बुक्कावार, नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाले, नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, नवभारत विद्यालय राजोलीचे पर्यवेक्षक सुधाकर पुराम, मुख्याध्यापक भगत, पर्यवेक्षक छत्रपती बारसागडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अशोक झाडे यांनी केले. संचालन विजय सिध्दावार यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य गरपल्लीवार यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.