मुल शहर तसेच परिसरात प्रसिध्द असलेल्या श्रीकृष्णा व्हाट्सअप्प ग्रुप चे न्यूज पोर्टल चे उदघाटन श्रीकृष्णा जन्माष्टमी चे औचित्य साधून करण्यात आले, श्रीकृष्णा ग्रुप च्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने मुल शहरात विविध समाजपोयोगी उपक्रम राबविण्यात येतात, तसेच सर्वात पहिले कोणतीही घडामोड सर्व सदस्यांना सबसे तेज असल्याची ख्याती या ग्रुप ची आहे, ग्रुप सदस्यांच्या मागणीनुसार ग्रुप चे न्युज पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानुसार श्रीकृष्णा ग्रुप चे मुख्य अडमीन तथा नगर परिषद मुल चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले, मुल लाईव्ह चे संपादक अमित राऊत , श्रीकृष्णा ग्रुप चे अडमीन किशोर कापगते, प्रशांत समर्थ, ऍड बल्लू नागोसे, राकेश ठाकरे, श्याम उराडे, प्रवीण मोहूर्ले, पप्पू केदार, प्रशांत मुत्यारापवार, सुनील महाडोळे यांची उपस्थिती होती, भगवान श्रीकृष्णा च्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,*