Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedसमाज संस्‍कारक्षम करण्‍यासाठी ज्‍येष्‍ठ नागरिकांचे महत्‍वपूर्ण योगदान....:- सुधीरभाऊ मुनगंटीवार

समाज संस्‍कारक्षम करण्‍यासाठी ज्‍येष्‍ठ नागरिकांचे महत्‍वपूर्ण योगदान….:- सुधीरभाऊ मुनगंटीवार

समाज घडविण्‍यासाठी व संस्‍कारक्षम करण्‍यासाठी ज्‍येष्‍ठ नागरिकांचे मोलाचे योगदान आहे. ज्‍येष्‍ठांचा सन्‍मान हा पहिल्‍या पिढीकडून दुस-या पिढीकडे सहजपणे जातो. ज्‍येष्‍ठ नागरिकांचा संस्‍कारातुनच आज देशाला विविध क्षेत्रात यशाची उंच भरारी घेणारे नागरिक लाभले आहेत. शरीराने थकले असाल तरीही मनाने थकू नका, मन ताजेतवाणे ठेवा. आम्‍ही खंबीरपणे तुमच्‍या सोबत आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे वन मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक मंत्री, तथा चंद्रपूर चे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज आयोजित कार्यक्रमात केले.

दिनांक 13 ऑक्‍टोबर रोजी ज्‍येष्‍ठ नागरिक संघ चंद्रपूर द्वारा आयोजित ज्‍येष्‍ठांचा अमृतमहोत्‍सवी सत्‍कार सोहळा संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी ज्‍येष्‍ठ नागरिक संघाचे अध्‍यक्ष महादेवराव पिंपळकर, खा. सुरेश उर्फ बाळू धानोरकर, चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्‍यक्ष बाबासाहेब वासाडे, विजयराव चंदावार, गोपाळराव सातपुते, केशवराव जेनेकर,प्राचार्य तेजराम कापगते, पंढरीनाथ गौरकार, माणिकराव गहूंकर, लक्ष्‍मणराव ढोबे, वसंतराव आवारी यांच्‍यासह कार्यकारीणीचे सदस्‍य उपस्थित होते.

2 जुलै 2018 रोजी राज्‍य सरकारने ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी उत्‍तम आरोग्‍य, ताणतणावापासून मुक्‍ती, आर्थीक उन्‍नती, सामाजिक सन्‍मान या मुद्दयांच्‍या अनुषंगाने परिपत्रक काढले. दिनांक 6 सप्‍टेंबर 2022 रोजी राज्‍य सरकारने राज्‍यातील 75 वर्षावरील ज्‍येष्‍ठ नागरिकांना एस.टी. बसेसमध्‍ये मोफत प्रवास सवलत, ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी उत्‍तम आरोग्‍य सुविधा चंद्रपूर जिल्‍हयात उपलब्‍ध व्‍हाव्‍या यासाठी आपण प्रयत्‍नशील आहोत. देशातील सर्वोत्‍तम मेडीकल कॉलेज चंद्रपूरात आकारास येत आहे. तसेच टाटा ट्रस्‍टच्‍या सहाय्याने कॅन्‍सर हॉस्‍पीटल सुध्‍दा चंद्रपूरात पूर्णत्‍वास येत आहे. चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी बगीचे व क्रिडांगणे आम्‍ही विकसित केली त्‍याचा आनंद व लाभ ज्‍येष्‍ठ नागरिकांना होत आहे. 5250 सदस्‍य ज्‍येष्‍ठ नागरिक संघात आहेत, ही अतिशय आनंदाची बाब आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक संघाच्‍या भवनात वरच्‍या भागात सभागृह बांधकामाच्‍या संघटनेच्‍या प्रयत्‍नात मी सहभागी होईल व सर्वतोपरि मदत करेल अशी ग्‍वाही यावेळी दिली.

ज्‍येष्‍ठ नागरिकांना दीर्घायुरारोग्‍य लाभावे अश्‍या शुभेच्‍छा देत ज्‍येष्‍ठ नागरिकांच्‍या पाठिशी आपण उभे असल्‍याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाला ज्‍येष्‍ठ नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments