Thursday, February 22, 2024
HomeUncategorizedसार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2023 स्पर्धेचा निकाल जाहीर

सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2023 स्पर्धेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्याचे वन, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रेरणेतून घेण्यात येत असलेल्या सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2023 चा निकाल जाहीर झाला असून , येणाऱ्या 27 नोव्हेंबर 2023 ला स्पर्धेचा बक्षीस वितरण होणार आहे, नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सदर बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे, चंद्रपूर येथील गांधी चौकात सायंकाळी 6 वाजता हा सोहळा संपन्न होईल, मुल शहरातील सार्वजनिक चेपाजी गणेश मंडळाला प्रथम पुरस्कार, नेताजी गणेश मंडळ ला द्वितीय तर सन्मित्र गणेश मंडळाला तृतीय पुरस्कार मिळाला आहे, यांना अनुक्रमे रोख रक्कम 31001, 21001 व 11001 चे पारितोषिक दिले जाणार आहे , त्याचप्रमाणे पाच सार्वजनिक मंडळांना प्रत्येकी 5001 चे प्रोत्साहनस्पर बक्षिसे देण्यात येणार आहे, प्रोत्साहन पर सार्वजनिक मंडळात संगम गणेश मंडळ, शिव गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ, वाल्मिकी गणेश मंडळ व महात्मा ज्योतिबा फुले मंडळाचा समावेश आहे.
घरगुती स्पर्धेत प्रथम पुरस्काराचे मानकरी श्री अशोक आक्केवार हे ठरले असून त्यांना रेफ्रिजरेटर पुरस्कार रुपी देण्यात येईल, द्वितीय पुरस्कार सौ नयना जैन याना मिळाला असून त्यांना वॉशिंग मशीन देण्यात येणार आहे तर तृतीय पुरस्कार श्री वसंत भगत याना मिळाला आहे त्यांना सुजाता मिक्सर देण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे घरगुती गणेशोत्सव स्पर्धेत पण पाच प्रोत्साहनस्पर पुरस्कार देण्यात येणार आहेत , त्यात सर्वश्री शैलेश देशट्टीवार, राहुल आगडे,सक्षम समर्थ व प्रणित नमुलवार यांचा समावेश असून या सर्वांना प्रत्येकी एक हॉट पॉट देण्यात येणार आहे, प्रसंगी सर्व विजेत्यांना शिल्ड देण्यात येणार आहे, सर्व बिजेत्यांनी त्याचप्रमाणे परीक्षक, संयोजक व कार्यकर्त्यांनी समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments