गोंडवाना विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर सिनेट मतदारसंघाची निवडणूक आज पार पडली, मुल शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शिक्षक महा आघाडी, सेक्युलर पॅनल या तिन्ही पॅनल ने सदर निवडणूक प्रतिष्ठेची करत चांगलीच रंगत भरली, तिन्ही पॅनल ची कार्यकर्ता मंडळी मेहनत करताना दिसत होती,मुल येथील कर्मवीर महाविद्यालयात दोन बूथ वर मतदान झाले, दोन्ही बूथ मिळून 872 मतदान होते त्यापैकी 478 मतदारांनी आपला हक्क बजावला, 54.81% टक्के मतदान झाले, जी प च्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी अध्यक्ष संतोष सिंह रावत, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, तसेच अनेक नेत्यांनी निवडणुकीत सहभाग दाखवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला, मतमोजणी येणाऱ्या 7 तारखेला होणार असून आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे