आज 16 मे मुल येथील शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थिनींना “केरला स्टोरी” हा सिनेमा बघण्यासाठी चंद्रपूरला गेले, सदर चित्रपट महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सौजन्याने व भाजप महिला जिल्हा अध्यक्ष कु अल्काताई आत्राम यांच्या सहकार्याने दाखवण्यात आला, प्रत्येक मुलींनी नक्कीच हा सिनेमा बघावा का बघावा त्याची कारणे आहेत या सिनेमातून आपल्या लक्षात येतं की आज आपल्या समाजात आपल्या देशात केवळ धर्म परिवर्तनच नाही तर मुलींवर शारीरिक तथा मानसिक किती अत्याचार होतो हे लक्षात येईल त्यासाठी आपण शालेय शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेणे आवश्यकच आहे पण सोबतच धर्मसंस्कार धर्माचे शिक्षण देखील घेणे तेवढेच आवश्यक आहे कारण ज्या वेळेस आयसिस सारख्या किंवा जिहादी लोक आपल्या धर्माकडे मुलींना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात प्रेमाच्या जाळ्यातून असो किंवा आणखी कुठल्या धार्मिक शिक्षणातून असो ,मग अशा वेळेस आपल्या मुली एवढ्या सक्षम असल्या पाहिजे की आमच्या स्वतःचा धर्म काय आहे हे आपण त्यांना नीट समजून देऊ शकलो पाहिजे त्यासाठी सर्व मुलींनी आपली संस्कृती जपणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे आणि आपल्या पुढच्या पिढीस हे सर्व कळण्यासाठी आई-वडिलांनी त्यांना सांगणे आवश्यक आहे या सिनेमांमध्ये शालिनी नावाचा जो पात्र आहे त्ती मुलगी आजही कारागृहात आहे. या सिनेमा मधील एका पात्रांनी आपल्या आई-वडिलांना प्रश्न विचारलेला आहे की मी आज आइसिस सारख्या जिहादी संघटनेत का गेले? का बरं दुसऱ्या धर्माकडे आकर्षण वाटतं? कारण माझ्या आई-वडिलांनी मला लहानपणापासून माझा धर्म माझी संस्कृती शिकवलेलं नाही कदाचित मला आज मुली असल्यामुळे मी हा सिनेमा बघताना भावनिक झाले. प्रत्येक मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी बघावा असा हा चित्रपट अशे आवाहन प्रा डॉ सौ किरण कापगते यांनी केले आहे, मुल शहरातील मुली सुद्धा सदर शो ला गेल्या होत्या, अजून कुणाला शो बघायचा असल्यास त्यांना मोफत दाखवण्यात येईल संपर्क करावा असे आवाहनही सौ कापगते यांनी केला आहे