Thursday, February 29, 2024
HomeUncategorizedसुभाष प्राथमिक शाळेतील सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

सुभाष प्राथमिक शाळेतील सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल च्या वतीने वर्ग तिसरा ते आठवी च्या विद्यार्थ्यांन करिता सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा आयोजित केली होती.
या स्पर्धेचा निकाल जाहिर करून प्रत्येक वर्गातील पाच यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्या करिता आज दिनांक २९ सप्टेंबर रोज गुरूवारला दुपारी १२:०० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीचे परिसरातील शेतकरी भवनात गुणवंत विद्यार्थी अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता .
या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती ,पालक शिक्षक संघ आणि माता पालक संघाच्या पदाधिकारी व सदस्य , तसेच पालक वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहीत करन्या करीता कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मान.प्रा.मारोतराव पुल्लावार सर,बक्षिस वितरक म्हणून मुल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी मान. वैभव खांडरे साहेब,आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्र प्रमुख मान.प्रमोद कोरडे सर , तज्ञ मार्गदर्शक प्रा.महेश पानसे, सामाजिक कार्यकर्ते मान. प्रशांत बोबाटे, माजी नगरसेविका सौ. विद्याताई बोबाटे तसेच शाळा कमेटीचे अशोक कडुकार,बंडुभाऊ घेर, सौ.सुवर्णा पिपरे , सौ.नंदा सोनटक्के,सौ.ईंदुताई मडावी, श्री युनुस खान आणि सौ.सोनुताई म्हस्के,शाळेचे मुख्याध्यापक श्री अविनाश जगताप, पदवीधर शिक्षक श्री राजु गेडाम यांची प्रमुख उपस्थित होती.
या स्पर्धेत वर्ग तिसरा ते आठवी च्या ३०२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बंडु अल्लीवार सर, प्रास्ताविक कु. रिना मसराम मॅडम तर आभार श्री योगेश पुल्लकवार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते करिता जेष्ठ शिक्षक श्री राहूल मुंगमोडे सर, श्री अजय राऊत सर, सौ.सुकेशनी रामटेके मॅडम यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments