Thursday, February 22, 2024
Homeमूलसेमाना येथे रविवारी दिनांक 22/01/23 ला कोहळी समाजाचा मेळावा*

सेमाना येथे रविवारी दिनांक 22/01/23 ला कोहळी समाजाचा मेळावा*

कोहळी समाज संघटना शाखा- गडचिरोलीच्या वतीने, कोहळी समाज गडचिरोली व परिसरातील सर्व समाजबांधवांचा श्री क्षेत्र सेमाना हनुमान देवस्थान गडचिरोली येथील नवीन सभागृहामध्ये वार्षिक स्नेह मिलन मेळाव्याचा रोप्य महोत्सव, स्त्रियांकरता हळदी कुंकू ,समाजातील प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव, ज्येष्ठ नागरिक , सेवानिवृत्त कर्मचारी चा सत्कार सोहळा व कोहळी समाज मेळावा रविवारी दिनांक 22 जानेवारी 2023 रोज दुपारी ठीक १-०० वाजता आयोजित केला आहे
कार्यक्रमाचे उद्घाटक माजी बालगृह रक्षक अधिकारी माननीय भालचंद्रजी हांडेकर साहेब यांच्या हस्ते होईल ,चंद्रपूर जिल्हा सहकारी बॉर्ड चे अध्यक्ष ते . क.कापगते ,माजी प्राचार्य कर्मवीर महाविद्यालय मुल हे राहतील
प्रमुख अतिथी म्हणून डॉ पुंडलिक बोरकर साहेब पशुवैद्यकीय अधिकारी नागपूर, मा स्वप्निल गौपाले पोलीस उपनिरीक्षक चंद्रपूर ,किशोर पर्वते पोलीस उपनिरीक्षक , डॉ मनीष पर्वते ,डॉ गुरुदेव मस्के, मा लेखपाल लोधी , मा नमुदेवजी सोनवणे, मा जनार्दन मस्के इत्यादी मान्यवर असतील
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ जयंत पर्वते , तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे हे असतील तरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे कोहळी समाज संघटना शाखा- गडचिरोलीचे अध्यक्ष खुशाल मस्के यांनी कळविले आहे
सदर मंडळाच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments