चंद्रपूर लोकसभेचे दिवंगत खासदार स्वर्गीय बाळु धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले व आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या दोन्ही मुलांनी संयुक्त अग्नी दिली, चंद्रपूर जिल्ह्यातून तसेच संपूर्ण विदर्भातून त्यांच्या चाहत्यांनी आपल्या लोकप्रिय नेत्याची अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार सुनील केदार, आमदार विजय वडेट्टीवार तसेच अनेक नेत्यांची उपस्थिती होती, सर्वांनी आमदार श्रीमती प्रतिभा धानोरकर व धानोरकर कुटुंबियांचे सांत्वन केले, हजारोंच्या संख्येने जनसागर उलटला होता , उपस्थित जनसमुदाय लक्षात घेता स्व बाळूभाऊंची जनमानसात असलेली प्रचंड लोकप्रियता दिसून येत होती