स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकर गौरव समिती मुल तर्फे मुल शहरातील विविध ठिकाणी भेट देत महामानव भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करत आदरांजली वाहिली. बाबासाहेबांची जयंती आज सर्वत्र मोठ्या भक्तिभावाने साजरी होत आहे, शहरातील विविध ठिकाणी भेट देत सावरकर गौरव समितीचे सदस्य बाबासाहेबाना तसेच तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमांना आदरांजली वाहत नतमस्तक झाले, गौरव समिती चे किशोर कापगते, प्रवीण मोहूर्ले, विपीन भालेराव, तन्मय झिरे, संजय मारकवार,प्रज्योत रामटेके, प्रमोद कोकुलवार, प्रवीण मोहूर्ले चिमढा तसेच कार्यकर्ते उपस्थित होते