माजी केंद्रीय मंत्री तथा महाराष्ट्रातील भाजपचे मातब्बर नेते हंसराज अहीर यांची नुकतीच मागासवर्गीय आयोगाच्या अखिल भारतीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली होती, याच पार्श्वभूमीवर हंसराज अहीर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत विविध विशयावर चर्चा केली, देशातील इतर मागासवर्गीय समाजाची स्थिती आणि त्यांच्या उथाणासाठी काय करता येईल या प्रमुख विषयावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते, केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांची नवीन इंनिंग सुरु झाल्याने चंद्रपूर यवतमाळ क्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे