सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुल येथील रवीचंद राईस मिल चे ट्रक हे कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शी मधून धान खरेदी करून मुल कडे वापस येताना वैनगंगा नदीवरील हरणघाट पुलावर ट्रक चा समोरचा टायर अचानक फुटल्याने थोड्या वेळासाठी चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक पुलावरील कठड्यावर आदळला, ट्रक चा काही भाग पुलाच्या खाली सुद्धा गेला पण चालकाच्या समयसुचकतेने वेळीच ट्रक ला सांभाळत मोठी दुर्घटना होण्यापासून वाचली, सध्या पावसाळ्यात वैनगंगा नदीचे पात्र भरून वाहत असून चालकाच्या समयसूचकतेणे मोठी दुर्घटना टळली
हरणघाट नदीवर ट्रक पुलावरून खाली कोसळताना वाचला, चालकाची समयसूचकता
RELATED ARTICLES