माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांच्या मागणीला यश.*
ब्रह्मपुरी : २२ नोव्हेंबर २०२२
ब्रह्मपुरी वनविभागातील दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील परिसरातील हळदा बोडदा परिसरात मागील अनेक दिवसापासून वाघाचा हैदोस होता. K4 नावाच्या या वाघाने या परिसरातील अनेक नागरिकांना ठार केले आहे. परिसरात वाघाच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना बघता ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी या वाघाला जेर बंद करण्याची मागणी राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या संदर्भात वनमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी तात्काळ वाघाला जेरबंद करण्याचे निर्देश वनविभागाला दिले होते.
या संदर्भात काल २१ नोव्हेंबर रोजी वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली. संध्याकाळी ६:४५ च्या दरम्यान या वाघाला बेशुद्ध करून त्याला पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. या नरभक्षक वाघाने परिसरातील नागरिकांना ठार केले असून अनेक पाळीव प्राणी सुद्धा या वाघाच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. हा नरभक्षक वाघ जेरबंद झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून वन विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नागरिकांना आता मोकळा श्वास घेता येणार आहे. या नरभक्षक वाघाला जेरबंद केल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर व वनाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.