22 जुलै व 23 जुलै अश्या लागोपाठ दोन दिवस जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार हे मुल शहरात येत आहेत, 22 जुलै ला तालुक्यातील राजोली व बेंबाळं येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उदघाटन, मोरवाही ते मुल ला जोडणाऱ्या उमा नदीवरील नवीन पुलाचे उदघाटन, मुल शहरातील नवीन शासकीय विश्राम गृहांचे उदघाटन, अग्निशमन वाहनांचे उदघाटन, भोई समाजाच्या गेट चे भूमिपूजन अश्या विविध कार्यक्रम निमित्त पालकमंत्री शहरात आहेत, 22 जुलै ला सायंकाळी 6.30 वाजता मा सा कन्नमवार सभागृहात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे
त्याचप्रमाणे 23 जुलै रोजी नुकतेच पद्मश्री प्राप्त नाट्यकलावंत डॉ परशुराम खुणे यांच्या सत्कार समारंभानिमित्य स्वातंत्र्यवीर वी दा सावरकर फौंडेशन व जलतरण संघटना, मुल द्वारा आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, सदर कार्यक्रम हा दुपारी 2 वाजता मा सा कन्नमवार सभागृहात होणार आहे, त्याच ठिकाणी दुपारी 12 बाजता अनिरुद्ध बनकर यांच्या झाडीपट्टी लोकगीतांची मैफिल हा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे