मुल शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन 26 जानेवारीला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वने, सांस्कृतिक व मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. शॉपिंग कॉम्प्लेक्स, भाजी बाजार-मटन मार्केट, शाहिद स्मारक व भोई समाज स्वागत गेट अश्या विविध कामांचे लोकार्पण होणार आहे,संध्याताई गुरनुले, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर , माजी उपनगराध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, प्रभाकर भोयर, अजय गोगुलवार, चंद्रकांत आष्टनकर, प्रवीण मोहूर्ले, प्रशांत समर्थ, सर्व नगरसेवक , कार्यकर्ते उपस्थित राहणार असून नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे