Saturday, December 7, 2024
HomeBallarpurखमापूरचा आदर्श क्षेत्र म्हणून लौकीक वाढवणार

खमापूरचा आदर्श क्षेत्र म्हणून लौकीक वाढवणार

ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिला शब्द

नागपूर-चंद्रपूर मार्गावरील लखमापूर हनुमान मंदिर परिसर अध्यात्मिक ऊर्जा देणारा परिसर आहे. लखमापूर येथील अंतर्गत रस्ते, बोअरिंग तसेच ग्रामपंचायत स्तरावर 8 कोटी 50 लक्ष रुपयांचा निधी लखमापूरच्या विकासाकरिता उपलब्ध करून दिला. गावाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगीण विकासातून लखमापूरला आदर्श क्षेत्र म्हणून लौकीक प्राप्त करून देणार असल्याची ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

लखमापूर येथील नागरिकांशी ना. श्री. मुनगंटीवार यांनी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ‘कामे दर्जेदार असली तरच आपला परिसर, गाव, शहर व जिल्ह्याचा विकास होतो. लखमापूर येथील अंतर्गत रस्त्यांसह अनेक विकासकामे या भागात करण्यात आली आहेत. लखमापूर गावातील नागरिक कठोर परिश्रम करणारे आहेत. मी नेहमीच गरीब, कष्टकरी व सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा राहिलो आहे.’

या भागात अनेक समाजोपयोगी कामे केली असून दिलेला शब्द पूर्ण केला. या कष्टकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आधार देण्याचे काम महायुती सरकार करीत आहे. लखमापूरच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लखमापूर वासीयांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी त्यांच्या पाठीशी कायम उभा राहणार असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments