Saturday, December 7, 2024
HomeUncategorizedमंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा अविनाश भांडेकर यांना पुरस्कार जाहीर

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचा अविनाश भांडेकर यांना पुरस्कार जाहीर

मुंबई दि. ६ : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने देण्यात येणा-या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. या पुरस्कारांची घोषणा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर आणि कार्यवाह प्रमोद डोईफोडे यांनी केली.

पत्रकारिता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणा-या पत्रकारांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने विविध पुरस्काराने गौरविण्यात येते. मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून सन २०२२ च्या विविध पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. यंदाचा राज्यस्तरीय वृत्तप्रतिनिधसाठी देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ठ पत्रकारीता पुरस्कार गडचिरोलीचे पुण्यनगरी दैनिकाचे जिल्हा प्रतिनिधी व मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश भांडेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. अविनाश भांडेकर यांनी आपल्या ३१ वर्षाच्या प्रदिर्घ पत्रकारितेच्या क्षेत्रात शोध पत्रकारितेसोबतच सामाजिक, राजकीय बातम्या विविध माध्यमांतून प्रकाशित करुन समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. पुरस्कार निवड समितीचे प्रमुख म्हणून किरण नाईक, अनिकेत जोशी यांनी तर सदस्य सचिव म्हणून मिलिंद लिमये यांनी काम पाहिले.पुरस्काराचे वितरण मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लवकरच केले जाणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -spot_img

Most Popular

Recent Comments